#

Advertisement

Monday, December 18, 2023, December 18, 2023 WIB
Last Updated 2023-12-18T11:43:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लोकसभेत गदारोळ : तब्बल 34 खासदारांचे निलंबन

Advertisement

दिल्ली : लोकसभा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला आहे. एकाचवेळी तब्बल 33 खासदारांचे निलंबन करण्यात आले. संसदेतील ही रेकॉर्ड ब्रेक कारवाई असल्याचे बोलले जात आहे. सभागृहात गोंधळ घातल्याचा आरोप करत लोकसभेतील 31 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह डीएमके नेता टीआर बालू  यांचाही समावेश आहे.  तर, राज्यसभेतील एक विरोधी खासदारलाही गदारोळाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. सभापतींची ही कृती म्हणजे हुकूमशाही असल्याचा हल्लाबोल निलंबीत खासदारांनी केला आहे. संसदेच्या सुरक्षा मुद्द्याबाबत बोलताना गोंधळ घातल्याबद्दल शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांनी 13 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले होते. या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेत गदारोळ घातला. लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी संसदेच्या पाय-यांवर बसून आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी खासदारांशी चर्चा करून संसदेत प्रवेश केला. निलंबनाविरोधात या खासदारांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.  केला.  निलंबित खासदारांची शिक्षा आणि गृहमंत्री अमित शहा यांचे लोकसभेतील वक्तव्य बंद करण्याची मागणी हे खासदार करत होते. सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना अनेक वेळा या खासदारांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र सभागृहात गोंधळ सुरूच होता.