#

Advertisement

Saturday, December 16, 2023, December 16, 2023 WIB
Last Updated 2023-12-16T09:22:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

साताऱ्यातून उदयनराजे पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात?

Advertisement

सातारा : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसलेंनी शरद पवारांना दिलेल्या या शुभेच्छा. उदयनराजेंच्या या शुभेच्छांमुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. उदयनराजे साताऱ्यातून पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात आलेले राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या फेसबुक पोस्टची सध्या जोरादार चर्चा रंगते. साताऱ्यातील (Satara) सध्याच्या राजकीय परिस्थितीत उदयनराजेंच्या या शुभेच्छा लक्षवेधी ठरतायत. 2009 आणि 2014 साली उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि खासदार झाले. 2019 विधानसभा निवडणुकीत उदयनराजे निवडून आले. पण अवघ्या सहा महिन्यात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवली. पण त्यांना पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभा खासदार केलं. पुढे भाजप आणि उदयनराजे यांच्यात फारसं आलबेल असल्याचं चित्र पाहिला मिळालं नाही. भाजपाच्या अनेक राजकीय कार्यक्रमांना उदयनराजे गैरहजर होते.