#

Advertisement

Thursday, December 14, 2023, December 14, 2023 WIB
Last Updated 2023-12-14T12:01:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उद्धव ठाकरेंना धारावी पोलिसांकडून मोठा धक्का

Advertisement


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. ठाकरे गटाकडून 16 डिसेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाने धारावी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. ठाकरे गटाने धारावी पोलिसांना परवानगीसाठी पत्र पाठवलं होतं. पण धारावी पोलिसांनी ठाकरे गटाची मागणी मान्य केलेली नाही. धारावी पोलिसांनी ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवा, असं ठाकरे पोलिसांनी म्हटलं आहे. धारावी पोलिसांच्या या सूचनेनंतर ठाकरे गटाने मुंबई पोलीस आयुक्तांकडे मोर्चासाठी अर्ज केला आहे.
धारावी पोलिसांनी मोर्चाला परवानगी देण्याबाबत स्पष्टपणे असमर्थता दर्शवली आहे. धारावी पोलिसांच्या या भूमिकेनंतर आता ठाकरे गटाची कोंडी होताना दिसत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. धारावी पोलीस ठाण्याचे उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला पोलीस आयुक्तांकडे अर्ज करा, असा सल्ला दिलाय. त्यानंतर ठाकरे गटाने पोलीस आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे.