#

Advertisement

Thursday, December 21, 2023, December 21, 2023 WIB
Last Updated 2023-12-21T11:31:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्रात बहुजन रयत परिषदेच्या सक्षम कार्यकर्त्यांची फळी तयार !

Advertisement

मौजा अडेगाव ता. देवळी, जि. वर्धा येथे फलकाचे अनावरण 

वर्धा : मानवतेला न्याय देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते संघटित करुन वंचीतांना न्याय, हक्क, अधिकार मिळवून देण्यासाठी बहुजन रयत परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रात सक्षम कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे, संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांच्या आदेशानुसार संघटनेची जबाबदारी देऊन बहुजन रयत परिषद भक्कम करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी संघटनेचे बळ वाढवत आहेत, असे प्रतिापादन बहुजन रयत परिषदेचे विदर्भ अध्यक्ष अजयभाऊ डोंगरे यांनी केले.
बहुजन रयत परिषद च्या वतीने फलकाचे अनावरण आणि पदग्रहण समारंभ, मौजा अडेगाव ता. देवळी, जि. वर्धा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज, अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी साळवे यांच्या प्रतिमांचे पूजन करुन बहुजन रयत परिषद शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी डोंेगरे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महिला अध्यक्षा हिराताई खडसे उपस्थित होत्या.
राज्याच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन रयत परिषदेचे सर्व कार्यकर्ते आदेशानुसार संघटनात्मक काम संपूर्ण महाराष्ट्रात करीत आहेत. बहुजन रयत परिषदेच्या नव नियुक्त पदाधिकार्‍यांनी शपथ घेऊन सामाजिक आणि बहुजनावर होत असलेले अत्याचाराविरोधात एकजुटीने लढण्याची शपथ घेत बहुजन रयत परिषदेचे पदभार स्विकारला, असल्याचेही अजयभाऊ डोंगर यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष ओम बावणे, देवळी तालुका अध्यक्ष विनोद आमटे, देवळी संपर्क नेते ज्ञानेश्वर फुगे, तालुका उपाध्यक्ष रुपेश बावणे, सेलु तालुका उपाध्यक्ष मनिश वानखेडे, सालोड शाखा अध्यक्ष सुनिल पोटफोडे, लोणी शाखा अध्यक्ष गजू तिळले व्यासपीठावर उपस्थित होते.
हिराताई खडसे म्हणाल्या की, आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे आणि अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी दिलेला आदेश हाच संघटनेचा शेवटचा शब्द. तो शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही तयार आहोत.
यावेळी बहुजन रयत परिषदेवर तालुका संघटक राजू खंडारे, शाखा अध्यक्ष गंगाधर पडघान, शाखा उपाध्याक्ष विकास कांबळे, शाखा सचिव प्रविण कांबळे, शाखा कोष्याध्यक्ष दिपक कांबळे, सहसचिव गजानन खडसे, कार्यअध्यक्ष आकाश कांबळे, प्रसिद्धी प्रमुख मोहन कासारे, राजू खडसे, अर्जुन  खडसे, रोशन कासारे, भारत पडघान, प्रफुल्ल कांबळे या कार्यकत्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी संस्थापक लक्ष्मणराव ढोबळे आणि अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे आभार मानले. शोभाताई कांबळे, बेबिताई खडसे, राधाताई ककसारे, मंगलाताई कांबळे, दिक्षाताई खडसे, शुभांगीताई कांबळे, सिमाताई पडघान आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.