#

Advertisement

Thursday, December 7, 2023, December 07, 2023 WIB
Last Updated 2023-12-07T11:54:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दिशा सालियान प्रकरणात होणार आदित्य ठाकरेंची चौकशी

Advertisement

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश 
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान आत्महत्या प्रकरणामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ सुत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. दिशा सालियान प्रकरणामध्ये सध्या सत्तेत असलेलं एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार विशेष तुकडी (एसआयटी) स्थापन करुन चौकशी करणार आहे. या एसआयटी चौकशीमध्ये आदित्य ठाकरेंचीही चौकशी केली जाणार आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी काम करणार आहे.  दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी मागील काही काळापासून सातत्याने काही आमदारांकडून केली जात होती. याच मागणीची दखल घेत मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. आता लवकरच ही चौकशी केली जाईल असं सूत्रांचं म्हणणं आहे.