#

Advertisement

Thursday, December 7, 2023, December 07, 2023 WIB
Last Updated 2023-12-07T11:46:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नवाब मलिकांचा अजितदादांना पाठिंबा

Advertisement

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी बुधवारीच नागपूरमध्ये दाखल झाले. काही आठवड्यांपूर्वीच जामीनावर बाहेर आलेले नवाब मलिक अधिवेशनात सहभागी होणार असल्याने ते अधिवेशनादरम्यान शरद पवार गटातील आमदारांबरोबर बसणार की अजित पवार गटाबरोबर बसणार यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. हाच प्रश्न विधीमंडळाबाहेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. मात्र अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर बसल्याचं दिसून आले.
आमदार नवाब मलिक आज आले आहेत. ते कुठल्या गटाबरोबर बसणार?" असा प्रश्न अजित पवारांना पत्रकारांनी विचारला. त्यावर अजित पवार यांनी, "तुम्हाला काय करायचं आहे? ते आमदार आहेत. स्वत:चा निर्णय घ्यायला ते खंबीर आहेत. आतमध्ये कोणी कुठे बसायचं याचा पूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. मधल्या काळात काय काय घडलं हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे. सकाळी माझं आणि त्यांचं फोनवर बोलणं झालं. मी त्यांचं नागपूरमध्ये स्वागत आहे म्हणून फोन केला होता,  असं उत्तर दिलं.