#

Advertisement

Friday, December 8, 2023, December 08, 2023 WIB
Last Updated 2023-12-08T11:42:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद

Advertisement


नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केली आहे. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. मात्र  या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी आहे. बंदीच्या निर्णयानंतर मनमाड तसंच लासलगावसह अनेक बाजार समितांमध्ये कांद्याचे लिलाव झालेले नाहीत. तर अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत..
मार्चपर्यंत केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी निर्णयाचे नाशिक जिल्ह्यात सर्व पडसाद पडसाद उमटले असून, उमराणा इथं कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडत निषेध केला तर शेकडो शेतकऱयांनी निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी  मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको केला तर नांदगावमध्येही संतप्त शेतकऱयांनी येवला रोडवर  रस्त्यावर उतरत आंदोलन केले. मनमाड,मुंगसे येथे व्यापाऱ्यांना कांदा लिलाव बंद पडले.