#

Advertisement

Thursday, December 28, 2023, December 28, 2023 WIB
Last Updated 2023-12-28T12:33:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"भाजप नमो अँप"च्या परीक्षेत सोलापूरचे खासदार पास होणार का?

Advertisement

भाजप नमो अँपच्या माध्यमातून मोजणार खासदाराची कामगिरी  

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून, भाजपच्या खासदारांची मागील पाच वर्षांची कामगिरी देखील तपासली जाणार आहे. नमो अँपच्या माध्यमातून भाजप खासदाराच्या कामगिरीचा जनमताचा कौल घेतला जाणार आहे. नमो अँपमध्ये तुमच्या खासदारांची कामगिरी कशी वाटली? तसेच लोकसभेसाठी सध्याच्या खासदाराव्यतिरिक्त दुसरे दोन पर्याय कोण आहेत त्यांची नावे देखील या अँपमध्ये विचारण्यात आली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप आपला खासदार मतदार संघात लोकप्रिय आहे की नाही याचा आढावा आता या नमो अँपच्या माध्यमातून घेणार आहे. मात्र, नमो अँपच्या परीक्षेत सोलापूरचे खासदार पास होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. काय असणार या नमो अँप मध्ये, कसे काम करणार , याबाबतची माहिती..  
भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा 2024 निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपच्या खासदारांना दिव्य परीक्षेतून जावे लागणार आहे. खासदाराने मतदार संघात काय काम केले, याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी थेट जनतेच्या दरबारात जाण्यात येणार आहे. जनतेकडेच कौल मागण्यात येणार आहे. मतदार संघातील जनता भाजपच्या खासदारामागे ठामपणे उभी आहे की नाही, हे तपासण्यात येणार आहे. त्यासाठी या मतदार संघात सर्व्हे करण्यात येणार आहे. भाजप जनतेला या अँपच्या माध्यमातून भाजप खासदारांची कामगिरी जोखणार आहे. नमो अँपच्या माध्यमातून भाजप खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे होणार आहे. भाजप सर्व्हेच्या माध्यमातून जनमताचा कौल घेणार आहे. या सर्वेक्षणातून खासदार या मतदार संघात किती लोकप्रिय आहे, याचे गणित स्पष्ट होईल. तंत्रज्ञानाच्या आधारे भाजप थेट जनतेचे मत आजमावणार आहे. त्यामाध्यमातून कोणत्या मतदार संघात काय स्थिती आहे, याची माहिती घेण्यात येईल.
खासदारा व्यतिरिक्त आणखी कोणता पर्याय लोकांच्या मनात आहे का? याचाही कानोसा भारतीय जनता पक्ष घेणार आहे. त्यामुळे ज्यांनी मतदार संघात ढुंकूनही पाहिले नाही. जे केवळ अन्य कार्यक्रमातच व्यस्त होते, अशा खासदाराविषयी पक्षाला त्यांचे मत ठरविण्यात मदत होणार आहे. लोकांच्या मनात इतर कोणता उमेदवार आहे का? विरोधातील कोणत्या उमेदवाराविषयी जनमत आहे, याचा ही मागोवा या सर्व्हेतून होईल.