#

Advertisement

Friday, December 29, 2023, December 29, 2023 WIB
Last Updated 2023-12-29T11:24:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज ठाकरे - एकनाथ शिंदे युतीचे संकेत

Advertisement

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकनाथ शिंदेंच्या घरी  गुरुवारी, 28 डिसेंबर रोजी भेट झाली. या भेटीनंतर शिंदे गटाकडून आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरे आगामी काळात एकत्र येऊ शकतात असं सूचक विधान केलं आहे. असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधील आणखीन एक भूकंप ठरेल असं म्हटलं जात आहे.
एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रसारमाध्यमांशी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. जानेवारी महिना संपल्यानंतर लोकसभेच्या अनुषंगाने ज्या काही घडामोडी होतील त्यामध्ये राजसाहेब आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबांकडे गेलो तर त्यामध्ये चुकीचा अर्थ काढण्याचा काही संबंध येत नाही, असं शिरसाठ यांनी म्हटलं आहे. म्हणजेच भविष्यात लोकसभेच्या आधीच एकनाथ शिंदेंचा गट राज ठाकरेंसोबत किंवा राज ठाकरे शिंदे गटासोबत जाऊ शकतात असे स्पष्ट संकेत शिरसाठ यांनी दिले आहेत.