#

Advertisement

Friday, December 29, 2023, December 29, 2023 WIB
Last Updated 2023-12-29T12:04:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एकनाथ खडसे यांना चप्पल घालायला पैसे राहणार नाही !

Advertisement

नाशिक : जळगाव जिल्ह्यातील दोन नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद राज्यभर परिचित आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना सर्व पातळी सोडून देतात. आता राम मंदिरासाठी कारागृहात असण्याच्या विषयावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. ललितपूर जेलमध्ये मी होतो. परंतु गिरीश महाजन हे आमच्या सोबत होते, हे मला काही आठवत नाही. ते कोणत्या जेलमध्ये होते, ते माहिती नाही’, असे एकनाथ खडसे म्हणाले होते. त्याला जोरदार प्रत्युत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधून दिले आहे.
गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की , एकनाथ खडसे यांनी सर्वत्र मी दिसतो. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्यावर मला इलाज करावा लागणार आहे. आता त्यांना चप्पल घालायला पैसे राहणार नाही. कारण गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी त्यांना 137 कोटी रुपये भरावे लागणार आहे. तसेच 27 कोटी दंड भोसरी प्रकरणात भरावा लागणार आहे. यामुळे त्यांची परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे ते फालतू प्रश्न विचारात राहतात. कारसेवा आंदोलनात ते वेगळ्या जेलमध्ये होते. मी तत्कालीन खासदार गुणवंतराव सरोदे, वाय.जी.महाजन वेगळ्या कारागृहात होते. तेव्हाचे आमचे फोटो देशभर गाजले होते.