Advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नाव घेतच बोलले
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असल्याचं ते म्हणाले आहेत. 2024 च्या निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली आहे. यासाठी नागपुरात भाजपाद्वारे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विरोधकांना लक्ष्य केलं. मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं सुरु आहेत. इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना सुप्रिया सुळे मराठा आरक्षणाशिवाय इतर महत्त्वाचे प्रश्न नाहीत का असं सांगत निघून गेल्या होत्या. ज्यांना वारंवार संधी मिळाली त्यांच्या मनात असतं तर मंडळ आयोग लागू झाला तेव्हा आऱक्षण देता आलं असतं. कोण कोणत्या यादीत आहे हेदेखील पाहिलं नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.
