Advertisement
बहुजन रयत परिषदेने पुरावे सादर केले तर अनेक पोलीस अधिकार्यांचे काळधंदे बाहेर निघतील
सोलापूर : सोलापूर शहरातील सात पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांकडून हप्तेखोरी, लाचखोरी केली जात असल्यानेच अवैध धंद्ये तसेच समाजघातक काळे धंदे फोफावले असल्याचे तसेच याला वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोपी करीत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे यांनी केला होता. आता, प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची लाचेची मागणी करत एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी केलेले पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याने सोलापूर पोलिसांच्या विश्वासार्हतेवर खरोखरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्याशी संपर्क साधला असता मी खरं तेच सांगते! बहुजन रयत परिषदेकडे असलेले पुरावे सादर केले तर अनेक पोलीस अधिकार्यांचे काळधंदे बाहेर निघतील, असे स्पष्ट करीत सोलापुरातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या आशिर्वादानेच असले उद्योग सुरू असल्याचा आजही माझा आरोप असल्याचे अॅड. कोमलताई यांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांच्या असल्या कारभारामुळेच सोलापूर शहर, जिल्ह्याचे नाव खराब झाले आहे. पोलिसांच्या आशिर्वादानेच शहरात आणि ग्रामीण भागात अवैध धंदे सुरू आहेत का? सोलापूरात शासन सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून याला जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकार्यांची खातेनिहाय चौकशी व लाचलुचपत प्रतिबंधक अंतर्गत सखोल चौकशी होऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे यापूर्वीच केली आहे. आज झालेल्या लाचखोरी प्रकारणात पोलीस निरीक्षाकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याने सोलापूर पोलीस भ्रष्ट असल्यावर शिक्का मोर्तब झाल्याचे अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले.
