Advertisement
पुणे : जे काही घडलं याची चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळे संघटना ही स्वच्छ व्हायला लागली. त्याही पेक्षा नवीन लोकांना संधी द्यायची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. युवकांची संघटना आपण मजबूत करु शकलो तर माझी खात्री आहे की, उद्या निवडणुका होतील त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस युवकची एक फळी निर्माण झालेली असेल. ते राज्य चालवतील, लोकांची प्रश्न सोडवतील. ही परिस्थिती नक्की येईल”, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या गटावर जोरदार टोले लगावले. कुणी सोडून गेले याचा जास्त विचार करु नका. याउलट संघटना स्वच्छ झाली. आता तरुणांना जास्त संधी देईल, असं शरद पवार म्हणाले. मला आठवतंय, मी 1978 साली तरुण लोकांना मोठी संधी देवून निवडणुकीच्या रणांगणात घातलं. निवडणुका झाल्यानंतर सरकार दुसऱ्याचं आलं. काही दिवसांसाठी मी परदेशात गेलो होतो. मी परत आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं. 60 आमदार निवडून आले होते. त्यातील 6 शिल्लक राहीले. बाकीचे सर्व अन्य पक्षात गेले. त्यामुळे साहजिकच होतं की, 60 वरुन 6 वर आलो, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.
