#

Advertisement

Thursday, December 14, 2023, December 14, 2023 WIB
Last Updated 2023-12-14T11:42:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

...तर आम्ही तिघे दिल्लीला जाऊ !

Advertisement

नागपूर : विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारनवी दिल्लीला रवाना होणार असल्याचं म्हटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपण आज सायंकाळी विधानसभेचं काम वेळेत संपलं तर दिल्लीला रवाना होणार आहोत असं म्हटलं आहे. नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी विधानसभेबाहेर नागपूरमध्ये चर्चा करत असताना अजित पवार यांनी ही माहिती दिली.
अजित पवार यांनी आपण बुधवारी अमित शाहांना भेटल्याचं सांगितलं. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ शपथविधीसाठी अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भोपाळला गेले होते. मोहन यादव यांच्या शपथविधीमध्ये सहभागी झाल्याचं सांगताना, काल आम्ही अमित शाहांना भेटलो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला आम्ही तिघेही गेलो होतो. त्यांच्याबरोबर बोलताना आम्ही कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न याबद्दल बोललो. तसेच दुधाचा प्रश्नही त्यांच्याकडे मांडला. मात्र आम्ही इथेनॉल आणि कांदा प्रश्नी चर्चा करण्यासाठी तुमची वेळ हवी आहे असं त्यांना सांगितलं. त्यांनी 15 तारखेची वेळ दिली आहे, असं अजित पवार म्हणाले.