#

Advertisement

Wednesday, December 27, 2023, December 27, 2023 WIB
Last Updated 2023-12-27T13:27:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजप बैठकीचे आमंत्रण काँग्रेसचे नेते नितीन शिवशरण यांना कोणी दिले ?

Advertisement

भाजपच्या मातब्बर राजकारण्याची पडद्याआडून खेळी 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेश पदाधिकारी नितीन शिवशरण हे भाजपच्या मेळाव्यात दिसल्याने सोलापुरातील काँग्रेस पक्षाला हा धक्का मानला जात आहे. मात्र, भाजप बैठकीचे आमंत्रण काँग्रेसचे नेते नितीन शिवशरण यांना कोणी दिले ? याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.

सोलापुरात भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी व सुपर वॉरियर्स मेळावा श्री छत्रपती रंगभवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. 

या बैठकीत काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभाग सेलचे प्रदेश पदाधिकारी राहिलेले नितीन शिवशरण हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठीमागे बसलेले दिसून आले. 

एकीकडे प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असताना दुसरीकडे नितीन शिवशरण भाजपाच्या गोठ्यात दिसल्याने हा काँग्रेसला धक्काच म्हणावा लागेल.

नितीन शिवशरण हे आमदार सत्यजित तांबे यांचे समर्थक मित्र मानले जातात. सध्या ते भाजप नेते उदय पाटील यांच्यासोबत असल्याचे अनेकदा पाहण्यात आले आहे. मात्र, आजच्या भाजप बैठकीचे निमंत्रण हे फक्त वरिष्ठच देऊ शकतात, त्यामुळे शिवशरण यांना बैठकीचे निमंत्रण नेमके कोणी दिले, याबाबत चर्चा सुरु आहे.