Advertisement
सोलापूरात श्री छत्रपती रंगभवन सभागृहात मेळावा
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आज, झालेल्या विशेष बैठकीत खासदारकीसाठी प्रबळ दावेदार असलेले अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याच पहिल्या रांगेत राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांना स्थान देण्यात आले होते, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूरात लक्ष्मणराव ढोबळे हे भाजपचे उमेदवार असणार की काय? अशी चर्चा या कार्यक्रमानंतर होती.
सोलापुरात भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी व सुपर वॉरियर्स मेळावा, सोलापूरात श्री छत्रपती रंगभवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या बैठकीत अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोलापूरातील आजी, माजी खासदार, आमदार ही उपस्थित होते. सोलापूरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सगळ्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत असलेले लक्ष्मणराव ढोबळे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या रांगेत आजी, माजी खासदार आणि दावेदार असलेले उमेदवार होते. यातून सोलापूरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
