#

Advertisement

Saturday, January 13, 2024, January 13, 2024 WIB
Last Updated 2024-01-13T11:41:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवस अनुष्ठान करणार

Advertisement

दिल्ली : पंतप्रधानांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या 11 दिवस आधीपासूनच विशेष अनुष्ठान करणार आहे. एखाद्या तपस्वी व्यक्तीप्रमाणे मोदी हे व्रत करणार आहेत. माझ्या भावना मला शब्दांमध्ये व्यक्त करणं कठीण आहे. मात्र मी माझ्याकडून एक प्रयत्न केला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
शास्त्रांमध्ये देवाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापणा एक विशद प्रक्रिया आहे. प्राणप्रतिष्ठापणेसंदर्भातील हे नियम मूळ कार्यक्रमाच्या अनेक दिवसांआधीपासूनच पाळावे लागतात. एक रामभक्त म्हणून पंतप्रधान मोदी राममंदिराच्या निर्माणामध्ये आणि प्राणप्रतिष्ठापणेसाठी एक अध्यात्मिक साधनेच्या माध्यमातून भावना प्रकट करत आहेत. आपली सर्व कामं आणि जबाबादऱ्या पार पाडताना प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आणि त्यापूर्वी सर्व नियम आणि तपश्चर्यांचं पालन दृढपणे करणार आहे. शास्त्रांमध्ये जसा उल्लेख आहे तसेच मी हे व्रत करणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींनी 11 दिवसांसाठी या नियमांचं पालन सुरु केलं आहे.
देवाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापणा करणे ही एक ईश्वरीय चेतनेचा संचार त्या प्रतिमेत करण्याचं अनुष्ठान आहे. यासाठी शास्त्रामध्ये अनुष्ठानाआधीच्या व्रताचे नियम निर्देशित केले आहेत. त्यानुसार पंतप्रधान मोदी आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये ब्रम्हमुहूर्त जागरण, साधना आणि सात्विक आहारासारख्या नियमांचं पालन अगदी आजही करतातच. मात्र पुढील 11 दिवस मोदींनी कठोर तपश्चर्या करण्याचं व्रत घेतलं आहे.