#

Advertisement

Saturday, January 13, 2024, January 13, 2024 WIB
Last Updated 2024-01-13T11:30:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमंत्रण नाही तरी अयोध्येला जाणार !

Advertisement

 शरद पवारांचं मोठं विधान, घराणेशाहीच्या टीकेलाही उत्तर 

 जुन्नर : अयोध्येतील 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यसाठी देशभरातील लोकांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना या सोहळ्यासाठी निमंत्रित न केले गेल्याने विरोधकांनी भाजपाला धारेवर धरलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या भव्यदिव्य सोहळ्याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 
अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही. पण मी जाणार. मात्र मी 22 जानेवारीला जाणार नाही. त्यानंतर नक्की जाईन. श्रीराम हे सर्वांचे आहेत, असे शरद पवार म्हणाले.
जुन्नर येथे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पाच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिराच्या कार्यक्रमाबाबत भाष्य केलं. तसेच यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी घराणेशाहीवरुन केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.
पंतप्रधान काल येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले घराणेशाही आली, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होती. मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली. त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाही बाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं, असंही शरद पवार म्हणाले.