#

Advertisement

Thursday, January 18, 2024, January 18, 2024 WIB
Last Updated 2024-01-18T11:34:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास

Advertisement

शिंदेंच्या कारमध्ये फडणवीसांना विंडोसीट  

मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ऍडजेस्ट प्रवास केला आहे. तडजोड केलेल्या प्रवासाचा कारमधील व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मुख्यमंत्री शिंदेंच्या कार चालकाने सेल्फी कॅमेरात काढण्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालकाच्या बाजूच्या सीटवर येऊन बसताना दिसतात. बसण्याआधी ते दाराजवळ उभे राहून समर्थकांना हात दाखवतात आणि स्थानापन्न होतात. दरम्यान शिंदे गाडीमध्ये बसण्याआधीच बॅक सीटवर मध्यभागी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसलेले दिसत आहेत. शिंदे कारमध्ये आल्यानंतर मागील बाजूच्या सीटवर बावनकुळेंच्या उजवीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या मागील रांगेतील विंडो सीट पकडतात. तर बावनकुळेंच्या डावीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार कारमध्ये शिरतात. आता मागील सीटवर पूर्ण क्षमतेने म्हणजेच 3 सीटवर 3 नेते झाल्यानंतरही चालकाच्या मागील दारामधून भाजपाचे आमदार गिरीश महाजन कारमध्ये शिरतात. महाजन कारमध्ये शिरल्याने अजित पवार अजून उजवीकडे सरकतात. दरम्यान बावनकुळेही महाजनांना जागा करुन देण्यासाठी पुढे सरकून बसतात. त्यामुळे एका बाजूने फडणवीस दुसरीकडून महाजन अशा स्थितीत मध्यभागी बावनकुळे आणि अजित पवार फोर्थ सीटवर बसल्याप्रमाणे अगदी दाटीवाटीने बसलेले दिसतात.