Advertisement
सोलापूर : सोलापुरातील कामगारांना घर मिळालं याचा मला आनंद आहे. माझ्याकडे लहाणपणी असं घर नव्हतं, अस म्हणताच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूरात १५ हजार घरकुलांचं लोकार्पण झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी चांगलेच भावूक झाले होते.
नरेंद्र मोदी म्हणाले की, अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नात आहे. सोलापुरात अहमदाबादचे अनेक पद्मशाली परिवार वास्तव्याला आहेत. माझा एक मित्र सोलापुरातून मला जॅकेट पाठतो, मी नको म्हटलं तरी मला तो जॅकेट पाठवतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, आमच्या सरकारने गरिबांसाठी काम केलं. गरिबी हटावचा नारा देऊनही गरिबी हटली नव्हती, आम्ही नऊ वर्षांत 25 कोटी लोकांना गरीबितून बाहेर काढलं. 2024 पूर्वी तर अनेकांची बँकेत खाते देखील नव्हती. जर बँकेत खातं नाही तर कर्ज कसं मिळणार. आमच्या सरकारनं वन नेशन वन रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली असंही मोदी यांनी सांगितले.
