#

Advertisement

Monday, January 22, 2024, January 22, 2024 WIB
Last Updated 2024-01-22T12:57:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"श्री राम: शरणं मम ।।" : ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे

Advertisement


पुणे :  अयोध्येत राममंदिर मूर्ती प्रतिष्ठापन सोहळा मोठ्या उत्साहात झाला. याबाबत अनेकांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. याबाबत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, आपला देश रामभक्तीत लीन झाला आहे. आज अयोध्येत सुरु असलेल्या राम मंदिराच्या सोहळ्याची गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वजण वाट पाहात होते. आज अखेर भारतीयांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. 


"श्री राम: शरणं मम ।।"

राम मंदिरातील सोहळ्याचे वर्णन शब्दात करु शकत नाही, असे म्हणते, "मेरे राम आए हैं. जे लोक रामाला आपलं मानतात ते सगळेच लोक आज भावूक झाले आहेत. या सोहळ्याचे कसे वर्णन करु? माझ्याकडे शब्द नाहीत. आपण प्रत्यक्ष ईश्वराला जेव्हा पाहू, तेव्हा आपल्याला काही सुचणार नाही. तशीच भावना प्रत्येक माणसाची झाली आहे. तसेच टिव्हीवरुन हा सोहळा बघत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची भावना देखील तशीच होती, खरच यासाठी शब्द नाहीत.