#

Advertisement

Wednesday, January 31, 2024, January 31, 2024 WIB
Last Updated 2024-01-31T12:07:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर

Advertisement


फेब्रुवारी महिन्यात साताऱ्यात होणार भव्य सत्कार

पुणे : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्काराची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज हे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक आहेत. 
फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 वेळा महाराष्ट्र दौ-यावर येण्याची शक्यता आहे. 5, 11 आणि 19 फेब्रुवारीला मोदी महाराष्ट्रात येणार असल्याचं बोललं जातं आहे. 5 फेब्रुवारीला जळगाव, 11 फेब्रुवारीला यवतमाळ आणि 19 फेब्रुवारीला पुणे, नागपूर असा दौरा करण्याची शक्यत आहे. नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करतील तर नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षाच्या वेगवेगळ्या आघाडीच्या खास सभा घेण्याचं ठरवल आहे. त्या सभेला मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.