#

Advertisement

Wednesday, January 31, 2024, January 31, 2024 WIB
Last Updated 2024-01-31T12:01:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला?

Advertisement

काँग्रेस स्वत: केला खुलासा 
पश्चिम बंगाल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. या यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला का? यावर स्वत: काँग्रेसने उत्तर दिल आहे.
काँग्रेसने ट्विटरवर पोस्ट करत व्हायरल माहिती खोटी असल्याचं सांगितलं आहे. 'पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधींना भेटण्यासाठी मोठा जनसमुदाय आला होता. या गर्दीत राहुल गांधींना भेटण्यासाठी अचानक एक महिला त्यांच्या कार समोर आली, त्यामुळे अचानक ब्रेक लागला. त्यानंतर सुरक्षा वर्तुळात वापरलेल्या दोरीमुळे गाडीची काच फुटली', अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. 
दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमध्ये दाखल होणार आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं महत्त्व कमी करण्यासाठी नितीश कुमार यांन टायमिंग जुळवलं, अशी शक्यता राजकीय वर्तुळात आहे.