Advertisement
पुढील महिन्यात महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक
मुंबई : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. या सर्व 56 जागांवरील खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल 2024 ला संपणार आहे. त्यापूर्वी 27 फेब्रुवारीला या 56 जागांसाठी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीचा तारीख जाहीर झाली आहे. या निवडणुरीची अधिसूचना 8 फेब्रुवारी 2024 ला निघेल. तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. तसेच अर्जाची छाननी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत ही 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. राज्यसभेच्या या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी 2024 सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाणार आहे.
राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, ओडिसा, राजस्थानच्या प्रत्येकी 3 जागा, महाराष्ट्र आणि बिहारच्या प्रत्येकी 6 जागा, गुजरात, कर्नाटकच्या प्रत्येकी 4 जागा, छत्तीसगढ, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडची प्रत्येकी 1 जागा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी 5 जागा, तेलंगणाच्या 3 जगा, उत्तर प्रदेशच्या 10 जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्र या सहा जगासाठी निवडणूक :
प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन नारायण राणे, भाजप
कुमार कतेकर, कॉग्रेस
वंदना चव्हाण, राष्ट्रवादी
अनिल देसाई. शिवसेना (ठाकरे गट)
