#

Advertisement

Monday, January 29, 2024, January 29, 2024 WIB
Last Updated 2024-01-29T11:26:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पक्षांतरबंदीसंबधीत समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

Advertisement

मुंबई : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी पक्षांतर विरोधी कायद्याचा पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. पक्षांतर विरोधी कायद्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
देशातील पक्षांतर विरोधी कायद्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या दहाव्या परिशिष्ठाचा राहुल नार्वेकरांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये वारंवार आधार घेतला आहे, त्या परिशिष्ठाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे.