Advertisement
सोलापूर : सोलापूरचे काँग्रेसचे नेते सुशीलकुुमार शिंदे किंवा त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी कुठलीही ऑफर दिलेली नाही, वृत्तमाध्यमातून या चुकीच्या बातम्या येत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून आपल्याला आणि प्रणिती यांना ऑफर असल्याचे काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे यांनी जाहीरपणे सांगितल्यानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच पालकंत्री पाटील यांनी शिंदे यांची त्यांच्या सात रस्ता परिसरातील जनवात्सल्य या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर सोलापुरमध्ये माठा राजकीय भुकंप होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. शिंदे आता भाजपमध्ये येणार की काय? प्रणिती यांना सोलापूर लोकसभेची उमेदवार भाजप देणार की काय? अशी चर्चा सर्वत्र पसरली होती. परंतु, यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करीत सगळी वावटंळ शांत केली आहेत. भाजपने काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे किंवा त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदा यांना कोणतीही ऑफर दिलेली नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सक्षम होण्याकरिता जे कोण तयार असतील त्यांचे स्वागत असल्याचेही ते म्हटले परंतु, शिंदे यांच्या उमेदवारीबाबत मात्र बावनुकळे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
दरम्यान, सोलापुरात होणार्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पालकमंत्री पाटील हे सुशीलकुमार शिंदे यांना केवळ निमंत्रण देण्यासाठी गेल्याचे तसेच त्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे उपस्थित स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये जाणार ही चर्चा आता बर्यापैकी निवळली आहे.
