Advertisement
पालकमंत्री चंद्रकांत पाटील केवळ नाट्य संमेलनाचे निमंत्रय देण्यासाठी सुशीलकुमार शिंदेकडे
सोलापूर : सोलापूर शहरात होणार्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निमंत्रण देणार असल्याकारणाने शिंदे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. राजकीय चर्चेचा विषय नाही, सोलापूरसाठी भापजपकडे सक्षम पर्याय असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्पष्ट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर दौर्यावर येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्व मोदी यांचा दौरा महत्त्वपूर्ण असून राजकीय प्रोटोकॉल प्रमाणे संबंधीतांना निमंत्रण दिले जात आहे, यामध्ये काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनाही आमंत्रण असणार आहे.
भाजपकडून आपल्याला आणि प्रणिती यांना ऑफर असल्याचे काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे यांनी जाहीरपणे सांगितल्यानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच पालकंत्री पाटील हे शिंदे यांची त्यांच्या सात रस्ता परिसरातील जनवात्सल्य या निवासस्थानी भेट घेत आहेत. यामुळे शिंदे आता भाजपमध्ये येणार की काय? असे राजकीय आराखडे बांधले जात असताना शिंदे यांनी मात्र आपण काँग्रेस कदापी सोडणार नसल्याचे सांगितले आहे. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनीही भाजपची भूमिका स्पष्ट केली गेली आहे.
सोलापुरात होणार्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पालकमंत्री पाटील हे सुशीलकुमार शिंदे यांना केवळ निमंत्रण देण्यासाठी जाणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असून यापूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात साहित्य संमेलन नाट्य संमेलन यशस्वी करून दाखवले आहे, त्यांचे योगदान लक्षात घेता स्वतः त्यांच्या निवासस्थानी त्यांना निमंत्रण देण्यासाठी जाण्याचे नियोजन पालकमंत्र्यांनी केले असल्याचे समजले.
दरम्यान, लोकसभेसाठी सोलापुरातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नसला तरी पक्षाकडे नवे आणि जुने असे दोन्ही सक्षम पर्याय असल्याचे स्पष्ट केले जात आहे. भाजपच्या काही नेत्यांनी शिंदे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी ते स्वत: काँग्रेसमधून बाहेर पडणार नाहीत, त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची शिंदे यांच्याशी केवळ औपाचिक भेट असून ते नाट्य संमेलनचे निमंत्रण देण्यासाठीच त्यांच्याकडे जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
