#

Advertisement

Saturday, January 20, 2024, January 20, 2024 WIB
Last Updated 2024-01-20T11:54:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुधीलकुमार शिंदेंकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न फसला

Advertisement

भाजपकडून ऑफर आल्याचे सांगितल्याची नुसतीच केली हवा

सोलापुर : घरांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भरतीय जनता पक्षाच्या सहकार्यातून माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पूर्णत्वास आणला आहे. याच प्रकल्पाला काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोध केला होता. आता, प्रकल्प पूर्ण होत असल्याचे पाहताचा शिंदे यांनी आपली आणि कन्येची प्रतिमा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करताना भाजपकडून आम्हाला लोकसभेची ऑफर असल्याचे सांगत पुन्हा एकदा सोलापुरातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मला आणि कन्या प्रणितीला भाजप प्रवेशाची ऑफर होती, मात्र ती आम्ही नाकारली, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला. गृहप्रकल्पाचे लोकार्पण होत असतानाच आपण अचूक वेळेची निवड केली आहे, असे शिंदे यांना वाटत असेल तर पंतप्रधान मोदी यांची सभा आणि भाजपला मिळणारा प्रतिसाद पाहता शिंदे यांनी पुन्हा प्रतिमा डॅमेज करून घेतली असल्याची चर्चा आता सोलापुरात सुरू आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून शिंदे यांचा गेल्या दोन निवडणुकांत पराभव झाला आहे. त्याची परतफेड करण्याची संधी आता प्रणिती यांना मिळणार आहे. त्यातच रे-नगर गृहप्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आणि आडम मास्तर यांची कल्पना आणि प्रयत्नांमुळे त्यांना वाढणारा प्रतिसाद तसेच भाजपची वाढणारी ताकद घेता सुशीलकुमार शिंदे यांनी यात पुन्हा एकदा खोडा घालण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून मला आणि कन्येला ऑफर असल्याचे सांगत त्यांनी सोलापुरातील राजकारण प्रकल्प लोकार्पण सोहळ्यापूर्वी ढवळून काढले. ही बाब लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदींनी भाजपकडून कोणालाही ऑफर दिलेली नाही, तशी गरजही नाही. भाजपकडे सक्षम उमेदवार असल्याचेही स्पष्ट करीत शिंदे यांनी केलेल्या दाव्याची हवाच काढून घेतली. मात्र, डॅमेज कंट्रोल करण्याएवेजी शिंदेंनी ती आणखी डॅमेज केली असल्याची चर्चा आता सुरू आहे.