#

Advertisement

Thursday, February 29, 2024, February 29, 2024 WIB
Last Updated 2024-02-29T11:29:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजप मध्ये गेलेल्यांच्या साखर कारखान्यांना कोट्यवधींची मदत ; एकूण 11 नेते 'लाभार्थी'

Advertisement

मुंबई : भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांच्या सहकारी कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थकहमी पोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत दिली आहे. एनसीडीसी मार्फत भाजप नेत्यांच्या कारखान्यांना मदत देण्यात आली आहे. यात रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक यांच्या कारखान्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
काँग्रेसमध्ये असलेले आणि भाजपला सातत्यानं मदत होईल, अशी भुमिका घेणारे धनाजीराव साठे यांच्या संत कुर्मदास सहकरी कारखान्याला 59.49 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. याआधी राष्ट्रिय सहकारी विकास निगमचा माध्यमातुन भाजप नेत्यांच्या कारखान्यांना जीवदान दिल्यानंतर आता अजित पवार यांनी देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मदत मिळवून देत जीवदान देण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले कारखाने

  • भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना : लक्ष्मी नगर नांदेड - 147.79 कोटी : व्यवस्थापन- अशोक चव्हाण
  • संत कुरुमदास सहकारी कारखाना पडसाळी सोलापूर - 59.49 कोटी: व्यवस्थापन - धनाजीराव साठे
  • सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना भाळवणी पंढरपूर- 146.32 कोटी रुपये: व्यवस्थापन - कल्याणराव काळे
  • छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूर- 128 कोटी रुपये: व्यवस्थापन- प्रशांत काटे
  • जय भवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर, गेवराई, बीड- 150 कोटी रुपये: व्यवस्थापन - अमरसिंह पंडित

एनसीडीसी मार्फत जीवदान मिळालेले भाजप नेत्यांचे कारखाने

  • शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर माळशिरस- 113.42 कोटी: व्यवस्थापन - विजयसिंह मोहिते पाटील
  • कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना महात्मा फुले नगर इंदापूर- 150 कोटी रुपये: व्यवस्थापन - हर्षवर्धन पाटील
  • निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजी नगर, रेडा इंदापूर- 75 कोटी रुपये: व्यवस्थापन- हर्षवर्धन पाटील
  • शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, लातूर- 50 कोटी रुपये : व्यवस्थापन- अभिमन्यू पवार
  • रामेश्वर सहकारी साखर कारखाना रावसाहेब नगर, जालना- 34.74 कोटी रुपये: व्यवस्थापन- रावसाहेब दानवे
  • भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर, सोलापूर- 126.38 कोटी रूपये: व्यवस्थापन- धनंजय महाडिक