Advertisement
पुणे : आमच्याकडे राज्यसभा जागा लढवण्यासाठी संख्याबळ नाही. बहुमत नसल्याने निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 28 फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. अशात या निवडणुकीत राष्ट्रवादी सहभागी होणार नसल्याचे खुद्द शरद पवार यांनी जाहीर केले आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यामुळे भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे सहा उमेदवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. मविआचं जागा वाटप कधी होणार हे देखील शरद पवारांनी सांगितलं आहे. जागावाटप चर्चा चांगली झाली. जागा जिंकण महत्वाचं असलं तरी ती जागा कशासाठी जिंकतोय हे महत्वाचं असतं. 9 ते 10 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.
