#

Advertisement

Saturday, February 3, 2024, February 03, 2024 WIB
Last Updated 2024-02-03T12:28:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'भारतरत्न' जाहीर.., 'अडवाणींनी या' दोन नेत्यांचे मानले आभार

Advertisement

दिल्ली : अयोध्या राम मंदिराच्या आंदोलनात सर्वात मोलाची भूमिका निभावणारे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत देशाच्या माजी उपपंतप्रधानांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार असल्याची माहिती दिली. यानंतर अडवणी यांनी आपली प्रतिक्रिया जारी केली असून अत्यंत विनम्रता आणि कृतज्ञतेने पुरस्कार स्विकारत असल्याचं म्हटलं आहे.
लालकृष्ण अडवाणी म्हणाले आहेत की, मी अत्यंत विनम्रतेने आणि कृतज्ञतेने आज जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराचा स्विकार करत आहे. माझ्यासाठी फक्त एक व्यक्ती म्हणून ही सन्मानाची बाब नाही, तर त्या आदर्श आणि मूल्यांचाही सन्मान आहे ज्यांची मी आयुष्यभर पूर्ण क्षमतेने सेवा करण्याचा प्रयत्न केला.
लालकृष्ण अडवाणी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह सर्वाधिक काळ काम केलं. भारतरत्न जाहीर झाल्यानंतर त्यांनी या दोन्ही नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, मी माझ्या पक्षाचे लाखो कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि इतर लोकांचे मनापासून आभार मानतो, ज्यांच्यासह मला सार्वजनिक आयुष्यातील पवासात काम करण्याची संधी मिळाली.