Advertisement
तोरंबा येथील मातंग समाजातील महिलेवर अत्याचार करून खून केलेल्या आरोपीस तत्काळ अटक करा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन
धाराशिव : तोरंबा ता. लोहारा जि. धाराशिव येथील मातंग समाजातील श्रीमती रूपाली दिगंबर दुणगे या मागासवर्गीय महिलेवर अत्याचार करून बलात्कार करून खून केलेल्या व्यक्तीवर तत्काळ कडक कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना बहुजन रयत परिषदच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह निवेदन दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, श्रीमती रूपाली डिगंबर दुणगे या मातंग समाजाच्या 25 वर्षच्या महिलेवर गजेंद्र गाविंद रणखांब, ललिता बिभिषण रणखांब व बिभिषण बालाजी रणखांब यानी शेतामध्ये कांदे कापण्यासाठी रविवार दिनांक 28/01/2024 रोजी बोलावून मानसिक व शारीरिक छळ करून बलात्कार करून खून केला, संबंधित आरोपीविरूध्द अट्रासिटी अॅक्टप्रमाणे व खून केल्याप्रकशी गुन्हा नोंद करून संबंधित आरोपी विरूध्द फास्ट कोर्टात केस दाखल करून तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर ऍड. कोमलताई साळुंखे - ढोबळे, जिल्हाध्यक्ष धाराशिव योगेश येडाळे. प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, सोलापूर जिल्हाध्यक्ष खंडू पवार, प्रदेश संपर्क प्रमुख दत्तात्रय पाटील, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष चंदू चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
