#

Advertisement

Friday, February 2, 2024, February 02, 2024 WIB
Last Updated 2024-02-02T11:24:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

संभाजीराजेंच ठरलं ! कोल्हापूरमधूनच लोकसभा लढणार

Advertisement

"स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही"

कोल्हापूर : महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी संभाजीराजेंना सामावून घेण्याची तयारी दर्शवली होती. पण यासाठी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश कऱण्याची अट घालण्यात आली होती. दरम्यान संभाजीराजेंनी गुरुवारी सायंकाळी स्वत:च्या स्वराज्य पक्षामधूनच निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची पोस्ट शेअर करत चर्चांना पूर्णविराम दिला होता.
यानंतर संभाजीराजे नेमक्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याबद्दल उत्सुकता होती. दरम्यान त्यांनी आपण कोल्हापूरमधूनच निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. लोकसभेला कोल्हापूरमधूनच रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी ते नाशिकमधून निवडणूक लढणार की कोल्हापुरातून याबाबत संभ्रम होता. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. संभाजीराजे उद्यापासून मतदारसंघाचा दौरा सुरू करणार आहेत.