Advertisement
मुंबई : भाजपचा दावा आहे की चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारही आज भाजपाच येण्यास इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्धीकी, मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तर, आणखी काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल केले जात आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सर्व आमदारांशी संपर्क करत आहेत, नाना पटोले काँग्रेसच्या सर्व आमदारांशी संपर्क साधत पक्षाची भूमिका स्पष्ट करत आहेत. तसंच, सर्व आमदारांना मुंबईत बोलवले आहे. आमदारांसोबत थेट प्रत्यक्ष संवाद साधत काँग्रेस पक्षासोबत राहण्याच्या भूमिकेचे आवाहन करणार आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनिथला शरद पवारांची भेट घेणार आहेत.यशवंत राव चव्हाण येथे ही भेट होणार आहे. यावेळी अशोक चव्हाण यांचे बंड व इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
