#

Advertisement

Tuesday, February 13, 2024, February 13, 2024 WIB
Last Updated 2024-02-13T12:37:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पार्थ पवार की समीर भुजबळ?

Advertisement

राष्ट्रवादी राज्यसभेवर कोणाला पाठवणार 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची मोठी संख्या आहे, तर, काही जणांची नावेदेखील चर्चेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देऊ शकते, अशी शक्यता आहे. देवगिरी निवासस्थानी आयोजित संध्याकाळच्या सातच्या बैठकीत उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर आमदारांसोबत चर्चा करून उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे. महायुतीकडून सर्वजणांचे एकत्रित उद्या राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यास हालचाली असल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, समीर भुजबळ किंवा पार्थ पवार ही तीन नावे राज्यसभेसाठी विचाराधीन आहेत. या नावापैकी आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.