#

Advertisement

Friday, February 9, 2024, February 09, 2024 WIB
Last Updated 2024-02-09T12:37:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षकावर ढाबा चालकाचा हल्ला

Advertisement

सोलापूर : जळगावमध्ये दोन दिवसांपूर्वी मद्यधुंद तरुणांनी एका हॉटेल मालकासह स्थानिक 17 ते 18 नागरिकांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षकावर ढाबा चालकाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवेढा तालुक्यातील मरवढे येथील उशिरापर्यंत सुरू ठेवलेल्या ढाब्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे आणि गाडी चालकावर ढाबा चालकासह सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच संबंधित परिसरात आरोपींची दहशत किती आहे ते या प्रकरणातून समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.