#

Advertisement

Saturday, February 10, 2024, February 10, 2024 WIB
Last Updated 2024-02-10T12:23:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजप त्यानंतर जाहीर करणार सोलापूर, माढाचा उमेदवार जाहीर

Advertisement

प्रणिती शिंदे यांच्या विरोधात महिला उमेदवार देण्याचीच तयारी 

सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव जाहीर केले आहे तर माढा मतदारसंघात राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार लढविणार आहे. परंतु, याठिकाणी उमेदवार कोण? हे अद्याप निश्चित झालेले नाही. यासंदर्भात बैठक होणार होती. परंतु, सध्या राज्यसभा निवडणुकीवर महाविकास आघाडीने लक्ष केंद्रीत केले आहे. याच कारणातून माढाचा उमेदवार अद्याप ठरविण्यात आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष हा निर्णय घेणार आहे. सोलापुरातून दोन खासदार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. परंतु, त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आपले उमेदवार जाहीर करणार आहे. मात्र, सोलापुरातील रणनिती ठरवित असताना प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजप महिला उमेदवारच देणार असल्याचे कन्फर्म आहे. 

माढा व सोलापूर या लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्याची पहिली बैठक पंढरपूर येथे होणार होती. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभेच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येणार होते. विशेषत: माढा मतदारसंघाबाबत पवार काही नावांची पडताळणी करणार होते. परंतु, वेगवान पक्षीय बदल, आमदार अपात्रता अशा राजकीय घडमोडींमुळे शरद पवार यांची ही नियोजित बैठक रद्द झाली होती त्यामुळे माढा मतदारसंघाच्या संभाव्या उमेदवारीबाबत निर्णय झाला नाही. ही नियोजित बैठक या महन्यांच्या (फेब्रुवारी) पहिल्या आठवड्यात होणार होती. परंतु, सध्या, राज्यसभेवर महाविकास आघाडीने लक्ष केंद्रीत केले आहे. 

दरम्यान, माढा विधानसभेचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, करमाळा विधानसभेचे आमदार संजय शिंदे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असून फलटणचे रामराजे निंबाळकर, माळशिरसचे उत्तम जानकर यांनीही अजित पवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे सध्या शरद पवार यांच्याकडे लोकसभेसाठी तगडा उमेदवार नसल्यानेही माढाच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. भाजपच्या ताब्यात गेलेला सोलापूर आणि माढा मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम उमेदवार देण्याच्या तयारी आहेत.

याच पर्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाही हे दोन्ही मतदार संघ आपल्याकडेच ठेवण्यासाठी तगडे उमेदवार देणार हे शिश्‍चित झाले आहे. काँग्रेसपक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खुद्द चंद्रकांत बावनकुळे यांनी महायुतीसह भाजप सोलापुरात निवडून येणाराच उमेदवार देईल, असे जाहीर केले होते. केंद्रीय संसदीय मंडळाच्या नेतृत्वाकडून लवकरच राज्यातील कोणती जागा कोणाला सोडायची, याबाबत निर्णय घेणार आहे. त्यानंतर उमेदवारीचाही निर्णय होणार आहे. लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची असल्यामुळे उमेदवार निवडून येण्याची जी काही सूत्रे आहेत, ती सूत्रे ज्यांच्याकडे असतील, त्या आधारे 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी उमेदवार ठरविण्याचा निर्णय होईल. सोलापुरातही अतिशय चांगला उमेदवार दिसेल, जसा सोलापूरचा उमेदवार सोलापूरचा असेल, तेवढाच चांगला उमेदवार हातकणंगले, नागपूर आदी सर्व जांगांवर देणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते. परंतु, विरोधक महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होत नसल्याने भाजपकडून सोलापूर आणि माढासाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जात नसल्याचेच सांगितले जात आहे.