Advertisement
दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडची बैठक सुरू झाली आहे. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला सोनिया गांधी, के. सी. वेणूगोपाल, मुकूल वासनिक उपस्थित आहेत. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चव्हाणांच्या राजीनाम्यासह महाराष्ट्रातल्या घडामोडींवर चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण कालपर्यंत जागावाटपात हिरीरीनं भाग घेत होते, मग अचानक काय झालं, चव्हाणांना राज्यसभा उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
