Advertisement
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षात होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. येत्या दोन दिवसात मी माझी पुढची राजकीय भूमिका काय असेल हे जाहीर करेन. अद्याप मी भाजप पक्षात प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असा मोठा खुलासा अशोक चव्हाण यांनी केला आहे.
चव्हाण भाजपत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. चव्हाण दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप भाजप पक्षात प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही असा खुलासा अशोक चव्हाण केला आहे. तसेच काँग्रेसच्या कोणत्याही आमदारांशी मी संपर्क साधलेला नाही किंवा कोणतेही आमदार माझ्या संपर्कात नाहीत असा खुलासा देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे.
