Advertisement
शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना आमंत्रण
बारामती : बारामतीत नमो रोजगार मोळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे. ‘गोविंदबागेत जेवायला या' असा निरोपच शरद पवार यांनी धाडला आहे. शरद पवार यांच्या या नित्रंत्रणामुळे राजकीय वर्तुळेत चर्चेला उधाण आले आहे.
बारामतीतल्या नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमातल्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाही. दोन मार्चला बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर नमो रोजगार मेळावा होतोय. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. विशेष म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचं नाव आहे. शरद पवारांचं नाव मात्र या कार्यक्रमपत्रिकेत नाही.
