#

Advertisement

Thursday, February 29, 2024, February 29, 2024 WIB
Last Updated 2024-02-29T12:00:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

Advertisement

लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर आणि सांगली या जगावर काँग्रेस लढ़णार 

मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाबाबत जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर लढणार आहे. त्यापैकी 2 जागा ठाकरे गट मित्रपक्षांना देणार आहे. काँग्रेसच्या वाटेला 15 ते 17 जागा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत आल्यास अकोल्याची जागा दिली जाणार आहे. त्याशिवाय वंचित सोबत आल्यास त्यांना आणखी एक ते दोन जागा दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गट मुंबईत 4 जागा लढण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गट उत्तर मुंबईसाठी उत्सुक नाही.  
ठाकरे गटाचा सुरुवातीपासूनच लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर दावा आहे. विशेष म्हणजे यापैकी 21 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढणार आहे. तर 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठाकरे गटाची आहे. यातली हातकणंगले ही एक जागा ठाकरे गट राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडायला तयार आहे. तर अकोल्याची एक जागा ठाकरे गट मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला सोडायला तयार आहे.