#

Advertisement

Thursday, February 15, 2024, February 15, 2024 WIB
Last Updated 2024-02-15T11:26:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंकजा मुंडे यांना राज्यसभेची पुन्हा हुलकावणी

Advertisement

आता काय भूमिका घेणार?

बीड : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर विधान परिषद किंवा राज्यसभेची निवडणूक आली की पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होते. यावेळी देखील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजकडून पंकजा मुंडे तिकिट मिळणार अशी चर्चा झाली. पण, यावेळी देखील ही चर्चा पोकळ ठरली. राज्यसभेवर पंकजा मुंडे जातील असा विश्वास राज्यभरातील कार्यकर्त्यांना होता. मात्र पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट देखील झाली होती. या भेटीत नेमकं काय घडलं हे पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. 
पंकजा मुंडे यांचे नाव प्रत्येक वेळी चर्चेत येते. पण पुढे त्यांचं नाव वगळलं जाते.  पंकजा मुंडे यांनी आपले   नाव चर्चेत कसे  येते याबाबत प्रश्न विचारला होता. दोन दिवसापूर्वी पंकजा मुंडे बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी आपल्यासोबत दगाफटका झाल्याचं त्यांनी जाहीर भाषणामध्ये बोलून दाखवलं होते. त्याचबरोबर प्रत्येक वेळी आपल्या नावाची चर्चा होते. आता मला मतदार संघ देखील उरला नाही त्यामुळे अशा चर्चा होत असतील असं देखील पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं होते. आपण कुठलीही दावेदारी किंवा उमेदवारी मागितली नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं होते.