Advertisement
पुणे : आणखी काही नेते संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. त्यावर रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. जे लोक त्यांच्या विचारांना बांधील नाहीत ते सर्व भाजपा सोबत जातील. ज्यांनी चुका केल्यात ते भाजपासोबत जातील, असं कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील आंबेगाव इथं नुकसान भरपाई मिळावी. यासाठी आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधव उपोषणाला बसले. त्यांना भेटण्यासाठी आमदार रोहित पवार हे आले होते. त्यावेळी ते माध्यांमासोबत बोलत होते. जे दोन गट भाजपा सोबत गेलेत. त्यांना विधानसभेला भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवाव्या लागतील, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
सत्तेत असणारे नेते आणि खास करून भाजपाच्या प्रमुख नेत्यांकडे पैसा आणि दबावतंत्र आहे. काँग्रेसचे एक नेते आता भाजपमध्ये गेले आहेत आणि आणखीन काँग्रेस मधील नेते आमदार भाजपमध्ये जातील. त्याची वेगवेगळी कारणं असू शकतील. भाजपा कडून पक्षात घेण्यासाठी अनेक लोकांना संपर्क केला जात आहे. मात्र जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला बांधील आहेत ते त्या ठिकाणी राहतील, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
