Advertisement
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हं दिले आहे. तर शरद पवार गटाला आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तीन नव्या नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव आज संध्याकाळी चार वाजेपर्यंतची देण्याची मुदत दिली होती. त्यानुसार शरद पवार गटाकडून तीन नावांचा प्रस्ताव दिला असून आता वटवृक्ष या चिन्हासाठी पवार गट आग्रही असल्यांचे समजते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही आहे. आता निवडणूक आयोग याबाबतच्या मागणीवर काय भूमिका घेतं ते पाहणं जास्त महत्त्वाचं असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने आतापर्यंत फक्त तीन नावे सूचवली आहेत. राज्यसभेसाठी चिन्हाचा वापर होत नाही. पण आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार गटाचं काय चिन्हं असेल ते देखील महत्त्वाचं आहे. कालपर्यंत उगवत्या सूर्याचं चिन्ह असेल अशी चर्चा सुरु होती. पण सूत्रांनी आता या प्रकरणी मोठी अपडेट दिली आहे. शरद पवार गट आता वटवृक्ष चिन्हासाठी आग्रही आहे.
