#

Advertisement

Wednesday, February 7, 2024, February 07, 2024 WIB
Last Updated 2024-02-07T12:15:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुनेत्रा पवार मैदानात ; दौरा अन् लोकांच्या भेटीगाठी

Advertisement

पुणे : शिरूर लोकसभेतून अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार उभा करून तो निवडून आणू, असं आव्हान अजित पवार यांनी दिलं होतं, त्यानंतर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्या आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिलेलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. सुनेत्रा पवार सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेत आहेत. शिरूर मतदारसंघात येणाऱ्या पुण्यातील वाघोली भागात सुनेत्रा पवार यांनी दौरा केला. तिथल्या स्थानिकांशी सुनेत्रा पवार यांनी संवाद साधला. त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना कटके आणि माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवास यांनी सदिच्छा भेट दिली. या भागातील विविध कार्यक्रमांना सुनेत्रा पवार हजर राहत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात आयोजित अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. यावेळी स्थानिक महिलांशी त्यांनी संवाद साधला. या भेटीगाठींमधून त्या महिलांशी संपर्क वाढवत आहेत.