#

Advertisement

Saturday, March 16, 2024, March 16, 2024 WIB
Last Updated 2024-03-16T13:21:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लोकसभा 2024 निवडणुकीच्या तारखांची घोषणा

Advertisement

एप्रिल, मे, जूनमध्ये मतदान; निकाल 4 जूनला
दिल्ली : लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. देशात लोकसभेचे निवडणूक 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान पार पडणार आहे. एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. केंद्रामध्ये पुन्हा कोण सत्तेत येणार हे 4 जून रोजी लागणाऱ्या निकालामधून स्पष्ट होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्याच्या क्षणापासून देशात आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि सुखबीर सिंह यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमारही यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात मतदान कधी?
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.

निवडणुकीचे टप्पे
पहिला टप्पा - 19 एप्रिल 21 राज्यांमध्ये मतदान होणार
दुसरा टप्पा - 26 एप्रिल रोजी एकूण 21 राज्यांमध्ये मतदान होणार
तिसरा टप्पा - 7 मे रोजी एकूण 12 राज्यांमध्ये मतदान पार पडणार
चौथा टप्पा - 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे.
पाचवा टप्पा - 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे.
सहावा टप्पा -  25 मे रोजी मतदान पार पडणार आहे.
सातवा टप्पा -  1 जून रोजी मतदान पार पडणार आहे.