#

Advertisement

Friday, March 15, 2024, March 15, 2024 WIB
Last Updated 2024-03-15T12:30:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुप्रिया सुळेंसाठी प्रचारासाठी पवार कुटुंब मैदानात

Advertisement

बारामती : लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होण्याऐवजी पवार विरुद्ध पवार होणार आहे. या लढतीसाठी पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या पाठिशी असल्याचे दिसून येत आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. या लढतीसाठी पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या पाठिशी असल्याचे दिसून येत आहे. आता पवार कुटुंबातील आणखी दोन जण सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे.पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करत आहेत. तसेच रोहित पवार यांच्या बहीण सई पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीचा प्रचार केला. अजित पवार यांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांच्या सुनंदा पत्नी तर सई मुलगी आहे.