#

Advertisement

Monday, March 11, 2024, March 11, 2024 WIB
Last Updated 2024-03-11T13:09:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महायुतीची आज दिल्लीत होणारी बैठक रद्द ; निर्णय लांबणीवर

Advertisement

दिल्ल्ली : महायुतीची आज दिल्लीत होणारी बैठक रद्द झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार दिल्लीला रवाना होणार होते. पण, आज होणारी बैठक रद्द झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा आणखी लांबणीवर गेली आहे. मंगळवारपर्यंत कोण कुठल्या जागेवरुन लढणार हे चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. भाजपाच महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटातील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. त्यात आत बैठक लांबणीवर गेली आहे.
महायुतीची बैठक रद्द झाली असली, तरी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची संध्याकाळी 6 वाजता बैठक सुरु होईल. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होतील. या बैठकीत महाराष्ट्रातील काही जागांवर चर्चा होऊ शकते. भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर उद्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होऊ शकते. यात महाराष्ट्रातील काही उमेदवारांची भाजपा घोषणा करतो का? याची उत्सुक्ता आहे.