Advertisement
भाजप देणार सोलापूर लोकसभेसाठीसाठी नविनच चेहरा
दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्र वापरल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना धक्का बसणार आहे. दिल्लीतून भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र, या यादीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून, तब्बल डझनभर विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे. भाजपकडून पक्षाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेत राज्यातील डझनभर विद्यमान खासदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन लोकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये कुणाला
सामाजिक समिकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता, 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याच्या तयारीत आहे.
खालील जागांवरील उमेदवार बदलायची दाट शक्यता :
बीड ,धुळे ,सोलापूर,सांगली,लातूर ,जळगांव,उत्तर मुंबई,उत्तर मध्य मुंबई,नांदेड,अहमदनगर,धुळे,वर्धा,रावेर.
