Advertisement
नंदेश्वर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांनी केली आहे.
गडदे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणात राजकारणात व तसेच प्रत्येक क्षेत्रात प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे मोठे योगदान आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्नांची ढोबळे त्यांना जाण आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तत्कालीन मंगळवेढा, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे याआधी ढोबळे यांनी नेतृत्व केले आहे. या दोन्ही मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात ढोबळे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एवढ्या सर्व जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना भाजपने उमेदवारी देणे गरजेचे आहे. प्राध्यापक ढोबळे यांची उमेदवारी म्हणजे विजयाची खात्री असेच जणू समीकरण सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात दिसत आहे. ढोबळे यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षाच्या पलीकडे ढोबळे यांना मानणारा मोठा वर्ग सध्या या मतदारसंघात आहे. ढोबळे यांनी स्थापन केलेली बहुजन रयत परिषद ही संघटना सध्या सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. आणि त्यांच्या शाहू शिक्षण संस्थेत कार्यरत असणारे कर्मचारी देखील या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर आहेत. या दोन्ही बाबींचा फार मोठा फायदा त्यांच्या उमेदवारीला व पक्षाला होणार आहे. व तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची यावरून देखील सध्या भाजपमध्ये पेच दिसतोय. या सर्व गोष्टींवर रामबाण उपाय म्हणजे प्रा. ढोबळे यांना उमेदवारी देणे हा आहे. असेही गडदे यांनी म्हंटले आहे.
